सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक आयोगाच्या वास्तूचे उद्घाटन

ग्राहक केंद्रित बाजारपेठ निर्माण होणे ही काळाची गरज;अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

सिंधुदूर्ग दि.८ मार्च

ऑनलाइन शॉपिंग व जागतिक ब्रँड आता घरपोच सेवा देत आहेत.अनेक मोठमोठे ब्रँड व कंपन्या जगभरातून भारतात दाखल होत आहेत. त्यामुळे ग्राहक केंद्रित बाजारपेठ निर्माण होणे ही आता काळाची गरज असून जागतिक बाजारपेठेत ग्राहक हाच राजा आहे असे उद्गार अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सिंधुदुर्गच्या भव्य वस्तूचा उद्घाटन सोहळा अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गुरुवारी पार पडला . यावेळी नाम फलकाचे अनावरण व फीत कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे , जिल्हाधिकारी किशोर तावडे, सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्षा इंदुमती मलूष्ठे, सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष परिमल नाईक, ऍड अमोल सामंत आदी मान्यवर उवस्थित होते.
देशभरातील ग्राहक चळवळीचा इतिहास मंत्री छगन भुजबळ यांनी या कार्यक्रमात विस्तृतपणे मांडला. बिंदू माधव जोशी यांनी सुरू केलेली ही चळवळ माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुढाकारामुळे ग्राहक संरक्षण कायद्याची झालेली निर्मिती आजच्या या जागतिक बाजारपेठेत फार मोलाची ठरली आहे. बदलत्या परिस्थितीमुळे या कायद्यात सुधारणा झाली वा त्याचाही फायदा ग्राहकांना होऊ लागला. जागतिक बाजारपेठ व जगातील मोठ मोठ्या कंपन्या मोठमोठे ब्रँड भारतात दाखल होऊ लागले. भारत ही मोठी बाजारपेठ असून ग्राहकांचे मोठे केंद्र असलेले ही बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत ग्राहकांची फसवणूक होऊ नये ग्राहकाचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी त्यावर ग्राहक आयोगाचा दबाव असावा म्हणून प्रयत्न सुरू झाले व या चळवळीला आता यशही आले. असेही छगन भुजबळ म्हणाले.

सुरेंद्र तावडे म्हणाले सिंधुर्गातील ग्राहक व न्यायदानाचे काम चांगले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहक आयोगाचे काम समाधानकारक आहे. जिल्ह्यातील ग्राहकांच्या अवास्तव तक्रारी नसून ग्राहकांचे त्यांनी कौतुक केले. ग्राहक म्हणून ज्यांच्यावर अन्याय झाला असेल त्या विरोधात दाद मागण्यासाठी कोणताही ग्राहक घरी बसून ही ऑनलाइन पद्धतीने दाद मागू शकेल एवढी यंत्रणा आता या आयोगाकडे झाली आहे. या आयोगाद्वारे आलेल्या तक्रारीचे लवकरात लवकर निपटारा करून पारदर्शक न्याय होईल याची गॅरंटी ही सुरेंद्र तावडे यांनी आपल्या भाषणात दिली.

जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले ग्राहक मंचाची ही वास्तू ही सिंधुनगरीच्या वैभवात भर घालणारी वास्तू आहे. या वास्तू मधून ग्राहकांना न्याय मिळेल व या वास्तुतून ग्राहकांची चांगली सेवा घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी या वास्तूसाठी केलेले काम व मेहनत कौतुकास्पद आहे. असेही ते म्हणाले.

ग्राहक हिताबद्दल, ग्राहक कायद्याच्या संरक्षणाबद्दल, गतिमान व सुरळीत न्यायदानाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती इंदुमती मलुस्टे यांनी प्रस्ताविकात सांगितले. ग्राहक हा केंद्रबिंदू असून ग्राहक अधिकाराचा भंग झाला तर त्याला न्याय देण्यासाठी हा आयोग निश्चितच काम करेल. तक्रार निवारणाचे काम तटस्थ व उत्तम दर्जाचे होईल व कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेईल! असं त्या म्हणाल्या. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही या आयोगाच्या या वास्तूच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न केले त्यांचेही श्रीमती मलूष्ठे यांनी कौतुक केले.