कणकवली नगरवाचनालयात तालुकास्तरीय वाचन स्पर्धेत हेमंत पाटकर प्रथम

द्वितीय किरण कदम तर सरिता पाटील यांना तृतीय क्रमांक;मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त प्रदर्शन व वाचन स्पर्धा

कणकवली दि.१४ जानेवारी(भगवान लोके)

मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त येथील नगरवाचनालयात रविवारी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले होते. याला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रदर्शनाचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित झाले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पीरखान, सहकार्यवाह डी. पी. तानवडे, कार्यकारिणी सदस्य वैजयंती करंदीकर, हेमंत पाटकर, सरिता पाटील यांच्यासह ग्रंथालय कर्मचारी व वाचक उपस्थित होते. यानिमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वाचन स्पर्धेत हेमंत पाटकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. किरण कदम यांनी द्वितीय तर सरिता पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेचा विषय मधुसुदन कालेलकर यांची कोणतेही साहित्यकृती वाचन होता. परीक्षण दत्तात्रय मुंडले, किशोर कदम यांनी केले. स्पर्धेत १५ वाचकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी हनीफ पीरखान, सहकार्यवाह डी. पी. तानवडे, कार्यकारिणी सदस्य वैजयंती करंदीकर आदी उपस्थित होते.