मालवण,दि.८ मार्च
मालवण तालुक्यातील माध्यमिक विद्यालय बिळवस येथील सहावीची विद्यार्थिनी हर्षिता संतोष पालव हिने नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेत ५०० पैकी ४९५ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक प्राप्त करत उत्तुंग असे यश मिळविले आहे. यापूर्वी एमटीएस परीक्षेत हर्षिता ही राज्यात प्रथम आली होती.
दि.५ मार्च रोजी एनटीएस परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये देशात प्रथम येत हर्षिता पालव हिने जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. हर्षिता ही भाजप शक्ती केंद्र प्रमुख मसुरे जि. प. मतदार संघ तथा बिळवस ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव यांची कन्या आहे. देश पातळीवर मिळविलेल्या यशा बद्दल हर्षिता हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.