मालवण,दि.८ मार्च
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे मालवण येथील सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या संकल्पनेतून स्वराज्य मित्रमंडळ, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य मित्रमंडळाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे गुरुवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात पुरुषांसह महिलांनीही लक्षणीय संख्येने रक्तदान केले.
या शिबिराचे उदघाटन पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत व पोलीस हवालदार सौ. पवार, सौ. सुविधा तिनईकर, लायन्स क्लब अध्यक्ष विश्वास गावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी केक कापून स्वराज्य मंडळाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी सौ. अनिता आळवे व स्नेहा हळदणकर यांचा तसेच स्वच्छता दूत महिलांचा महिला दिन निमित्त सन्मान करण्यात आला.
या शिबीरास ग्लोबल रक्तदाते संस्था, मातृत्व आधार फाउंडेशन, रोटरी क्लब मालवण, कामगार कल्याण केंद्र आदी संस्थांचे पदाधिकारी, मालवण पोलीस स्थानकाचे अधिकारी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वराज्य मंडळाच्या सौ. शिल्पा खोत, लायन्स क्लबचे अध्यक्ष विश्वास गावकर, लायन्स सदस्य वैशाली शंकरदास, अनुष्का चव्हाण, जयश्री हडकर, अंजली आचरेकर, सचिन शारबिद्रे, महेश कारेकर, गणेश प्रभूलकर, ग्लोबल रक्तदाते संस्थेचे राजू बिडये, नेहा शंकरदास, राजा शंकरदास, विकास पांचाळ, पल्लवी तारी, मातृत्व आधार फाऊंडेशनचे संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, दीक्षा लुडबे, फॅनी फर्नांडिस, राधिका मोंडकर, आनंद बांबर्डेकर, सप्नील परुळेकर, कृपाल वालावलकर, स्वराज्य मंडळाच्या चारुशीला आढाव, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर, दिया पवार, तन्वी भगत, कल्पिता जोशी, अश्विनी आचरेकर, दीपाली शिरहट्टी, दिक्षा तोंडवळकर, साक्षी मयेकर, स्वाती तांडेल, आर्या गावकर, कामगार कल्याण केंद्राचे संचालक संतोष नेवरेकर, नंदिनी गावकर, नंदिनी शीरहट्टी, अंजना सामंत, दिक्षा गोलतकर, गणेश कुडाळकर, मंदार ओरसकर, डॉ. मंगेश शिरदणकर, रविकिरण तोरसकर, सुहास धामणसकर, उमेश शिरोडकर, श्रीरंग ओटवणेकर आदी व इतर उपस्थित होते.