लेखी निवेदन देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची केली मागणी
सावंतवाडी,दि.८ मार्च
नाणोस गावातील बिबट्यांचा बंदोबस्त करा,असे लेखी निवेदनाद्वारे नाणोस ग्रामपंचायत सरपंच सौ.प्राजक्ता शेट्ये,ग्रामपंचायत सदस्य श्रीपाद ठाकूर,वासुदेव जोशी,बाबल ठाकूर,उमेश शेट्ये व गुळदुवे उपसरपंच यांच्यावतीने उपवनसंरक्षक अधिकारी वनविभाग सावंतवाडी यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले की,नाणोस गावात संध्याकाळ झाल्यानंतर लोकवस्तीतील घरांशेजारी बिबट्याचा ओरडण्याचा आवाज येतो.त्यामुळे गावातील नागरिक भयभीत असून काजू हंगाम सुरु असल्याने रानात जाण्यास भिती निर्माण झालेली आहे.तसेच सदर बिबटा हा रात्रीच्या भरवस्तीत भक्ष्याच्या शोधात फिरत असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.ग्रामसभेत ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याबाबत मागणी केलेली आहे.तरी भरलोकवस्तीत मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यांची गांभिर्याने दखल घेऊन त्वरित पिंजरा लावून बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.यावर येत्या दोन दिवसांत पिंजरा लावू असे आश्वासन वनधिकारी गाड यांनी दिले.
काल मा. उप वनसंरक्षक कार्यालय सावंतवाडी येथे सरपंच ग्रामपंचायत नाणोस व ग्रामस्थ यांनी मा. श्री. गाड यांची भेट घेऊन निवेदन देऊन याबाबत चर्चा करण्यात आली होती, त्या चर्चेत दिलेल्या आश्वासनानुसार निवेदनची तत्काळ दखल घेत घटनास्थळी काल वन परिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप संग्राम पाटील, गार्ड अप्पासो राठोड यांनी रात्री १२.१५ वा. नाणोस गांवाला भेट देऊन एक तासभर पाहणी केली त्यावेळी ग्रा.पं.सदस्य श्री.श्रीपाद ठाकुर उपस्थितीत होते .