किरण सामंत सावंतवाडी दौऱ्यावर आले यावेळी त्यांचे मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केले जंगी स्वागत
सावंतवाडी दि.८ मार्च
मी जरी लोकसभा निवडणुकीला इच्छुक असलो तरी पक्ष उमेदवारी देईल त्याचं मी काम करेन अशी प्रतिक्रिया सिंधू रत्न समिती सदस्य किरण उर्फ भैया सामंत यांनी आज येथे दिली. दरम्यान किरण सामंत सावंतवाडी दौऱ्यावर आले होते .यावेळी त्यांचे मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले.
श्री सामंत आज सावंतवाडी येथे भंडारी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून भंडारी समाजाच्या बाईक रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान आज महिला दिनाच्या अवचित्यसाधन श्री सामंत यांनी महिलांना देखील शुभेच्छा दिल्या यावी महिलांचे देखील लक्षणीय उपस्थित होती.
यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी , राजन पोकळे,नारायण राणे,रुपेश पावसकर, गजा नाटेकर, गुणाजी गावडे, योगेश नाईक, विनायक सावंत, महिला जिल्हाप्रमुख अँड नीता सावंत आनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, भारती मोरे, प्रेमानंद देसाई, प्रसाद अरविंदेकर, सुधीर आडीवरेकर, जगदीश मांजरेकर आदी उपस्थित होते.