स्पर्धेत ६० बैलगाड्यांचा सहभाग : बंड्या मांजरेकर मित्र मंडळाचे आयोजन
वैभववाडी,दि.१४ जानेवारी
बंड्या मांजरेकर मित्र मंडळ आयोजित बैलगाडा शर्यत स्पर्धेचे स्वरूप दरवर्षी वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे बैलगाडा शर्यतीचा थरार जिल्ह्यात पहायला मिळत आहे. या स्पर्धेची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. आज या स्पर्धेसाठी जमलेली गर्दी आणि स्पर्धेचे चित्र अगदी आनंददायी आहे. असे उद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले.
नाधवडे येथे बंड्या मांजरेकर मित्र मंडळ आयोजित राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत स्पर्धेला आमदार नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, इतर स्पर्धा प्रमाणेच या स्पर्धेला एक वेगळा प्रेक्षक वर्ग असतो. घाटमाथ्यावर ज्याप्रमाणे या स्पर्धा होतात त्याचप्रमाणे ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्पर्धेत कानाकोपऱ्यातून आलेल्या बैलगाडा मालकांना तसेच स्पर्धकांना त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी बंड्या मांजरेकर मित्र मंडळाच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी यावेळी माजी वित्त बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती बाळा जठार, माजी सभापती मनोज रावराणे, बाप्पी मांजरेकर, प्रकाश पारकर, सज्जन काका रावराणे, बंड्या मांजरेकर,बाबा कोकाटे व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते, बंड्या मांजरेकर मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.