कणकवली कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा ना.छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार

ग्राहक तक्रार निवारण आयोग इमारतीचे बांधकाम उत्कृष्ठ केल्याबद्दल सन्मान ; अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ केले कौतुक

कणकवली दि.८ मार्च (भगवान लोके)

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सिंधुदुर्गच्या भव्य इमारतीचे लोकार्पण सोहळा अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गुरुवारी पार पडला . या सोहळ्यात देखणी इमारत बांधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतल्याबद्दल बाकणकवली कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा ना.छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करीत सन्मान करण्यात आला आहे.यावेळी ना.भुजबळ यांनी श्री.सर्वगोड यांचे कौतुक केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे , जिल्हाधिकारी किशोर तावडे, सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्षा इंदुमती मलूष्ठे, सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष परिमल नाईक, ऍड.अमोल सामंत,काका कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.