येथे जागविल्या स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृती
फोंडाघाट,दि. ८ मार्च(संजय सावंत)
सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली चा सर्वात पहिला विश्रांती गृह म्हणून ओळख असणाऱ्या फोंडाघाट विश्रांती गृहाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून आज माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते व विद्यमान आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपास्थितीत या नूतन विश्रांती गृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
दरम्यान या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अजयकुमार सर्वगौड, अधीक्षक अभियंता छाया नाईक,तहसीलदार दिक्षांत देशपांडे , उप अभियंता प्रभू मॅडम,पवार रावसाहेब, नायब तहसीलदार यादव ,मंडळ अधिकारी दिलीप पाटील,माजी सभापती मनोज रावराणे,मिलिंद मेस्त्री, डामरे माजी सरपंच बबलू सावंत , राजन चिके ,बबन हळदिवे,उपसरपंच तन्वी मोदी,दर्शना पेडणेकर,विश्वनाथ जाधव,माजी सभापती सुजाता हळदिवे,सुनील लाड,भाई भालेकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
फोंडाघाट विश्रांती गृहाच्या लोकार्पण सोहळ्याला पालकमंत्री उपस्थित राहणारा असल्याने भाजपा कार्यकर्ते आणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती मात्र सावंतवाडी नवोदय विद्यालय येथील घडलेल्या घटने मुळे पालकमंत्री चव्हाण यांना तिकडे जावे लागल्याने आमदार नितेश राने व प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सर्वगौड यांच्या पुढाकाराने फोंडाघाट विश्रांती गृहाचे नूतनीकरण होत असताना सर्वगौड यांच्याच कल्पनेतून भारताचे भूतपूर्व पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी या फोंडाघाट विश्रांती गृह याठिकाणी राहिल्याच्या स्मृती प्रित्यर्थ विश्रांती गृहाच्या हॉल मध्ये स्व.अटल बिहारी वाजपेयी यांचा मोठा फोटो फ्रेम त्यांच्याच कवितांसह लावण्यात आल्याने आज विश्रांती गृहाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उपस्थित मान्यवरांनी उजाळा दिला.
फोंडाघाट विश्रांती गृहा ची दुरुस्ती साधारण दहा ते बारा वर्षा पूर्वी करण्यात आली होती मागील एक दोन वर्ष भरात या विश्रांती गृहाची पूर्ण दयनीय अवस्था झाली होती .वरील सर्व सिलिंग तुटून खाली कोसळले होते.वरील भागातून स्लॅब मधून पाणी गळती झाल्याने खोल्यानं मधील भिंतीची तसेच लाईट वायरिंग चीही पूर्ण अवस्था खराब झाली होती.यामुळे फोंडाघाट विभागात कोणतेही राजकीय किंवा समाजिक क्षेत्रातील महनीय व्यक्ती आल्यास राहण्याची किंवा थांबण्याची कोणतीही व्यवस्था होत नव्हती .
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अजयकुमार सर्वगौड यांच्या पुढाकारा ने फोंडाघाट विश्रांती गृहाची मुख्य इमारत तसेच येथील शिपाई राहत असलेल्या खोलीचेही नूतनीकरण सुमारे 35 लाख रुपये खर्चून करण्यात आले.
आज फोंडाघाट येथील नूतन विश्रांती गृह लोकार्पण सोहळ्या प्रसंगी फोंडाघाट मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते