दीक्षित फाउंडेशन व सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान शाखा देवगड यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर १० मार्च रोजी

देवगड,दि. ८ मार्च
कै निर्मला पुरुषोत्तम दीक्षित यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दीक्षित फाउंडेशन व सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान शाखा देवगड यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर रविवार दि.१०मार्च २०२४ रोजी सकाळी ९ते दु१ या वेळेत जि. प.शाळा पडेल न.१ य ठिकाणी आयोजित केले आहे.या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थापक निरंजन दीक्षित,माजी सरपंच विकास दीक्षित सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान अध्यक्ष हिराचंद तानवडे यांनी केले आहे.