जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना आजपासून मिळणार मोफत गृहोपयोगी भांडी संच

मालवण,दि. ८ मार्च

महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम मंडळामार्फत जिल्ह्यातील नोंदीत जीवीत बांधकाम कामगारांना दि. ९ मार्च पासून गृहोपयोगी ३० भांड्यांच्या संचाचे मोफत वाटप मालवण, कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, देवगड येथे तालुका ठिकाणी सकाळी ९ वाजल्यापासून करण्यात येणार आहे.

सदर संच हा कुटुंबातील एकाच नोंदीत बांधकाम कामगाराला मिळणार आहे. यासाठी नोंदीत बांधकाम कामगार यांनी हमीपत्र, बांधकाम कामगार ओळखपत्र फोटो पान झेरॉक्स किंवा ओळखपत्र झेरॉक्स, नूतनीकरण जीवीत ऑनलाईन पावती झेरॉक्स (नोंदणी जीवीत असणे आवश्यक) कामगार आधार झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स व आपल्या रेशनकार्डवर अन्य कोणी व्यक्ती नोंदीत कामगार असल्यास त्यांच्या आधार व बांधकाम ओळखपत्र झेरॉक्स आदी कागदपत्रे झेरॉक्स व ओरीजनल घेऊन उपस्थित राहणे आवश्यक आहे.

भांडी संचाचे वाटप ९ मार्च पासून मालवण येथे मामा वरेरकर नाट्यगृह परिसर, (मालवण येथील वाटप रविवारी १० मार्च रोजी एक दिवस बंद राहील व ११ पासून पुन्हा सुरू होईल), कुडाळ येथे पंचायत समिती हाॅल, सावंतवाडी येथे काझीशहा उद्दीन सभागृह, कणकवली येथे नगरपंचायत हाॅल, देवगड येथे खरेदी विक्री संघ कार्यालय याठिकाणी होणार आहे. तरी नोंदीत बांधकाम कामगारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय मजदूर संघ, सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष भगवान महादेव साटम यांनी केले आहे.