फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये..

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नाव न घेता शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर टीका

कणकवली दि. ८ मार्च ( भगवान लोके )

आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे , त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल, अशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नाव न घेता शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर टीका ट्विट करत केली आहे.