अक्कलकोट श्री स्वामी समर्थ “पालखी पादुका परिक्रमा” १९ जानेवारी रोजी

सावंतवाडी,दि.१४ जानेवारी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट श्री स्वामी समर्थ “पालखी पादुका परिक्रमा”शुक्रवार दि.१९ जानेवारी रोजी सकाळी १० वा. ब्राह्मण देवालय गवळीतीठा जवळ सावंतवाडी या स्थानकांवर आयोजित करण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी १२ वा. : श्रींची मध्यान्ह आरती
संध्याकाळी ५ वा : सावंतवाडी शहरात पालखी पादुका मिरवणूक,रात्रौ ७ वा. : आरती, दर्शन व महाप्रसाद,रात्रौ ८ वा. : दशावतारी नाटक तर दि. २० जानेवारी रोजी पहाटे ५.३० वा. अभिषेक करण्यात येणार आहे.सर्व भाविकांनी स्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, अशी विनंती ब्राह्मण देवालय परिसर मित्रमंडळ यांनी केले आहे.