राणेंनी स्वत: आत्मपरिक्षण केलं पाहिजे ;भाजपा स्वत:चा पक्ष वाढवताना इतर पक्ष संपवत आहे
कणकवली दि .८ मार्च(भगवान लोके)
नारायण राणेंनी जे रामदास कदमांबद्दल जे वक्तव्य केलं ते अत्यंत बरोबर आहे. परंतु राणे कुठल्या फांदीवर बसले होते आणि ती फांदी कशी तुटली याच राणेंनी स्वत: आत्मपरिक्षण केलं पाहिजे . राणेंनी स्वत:चा पक्ष काढला होता स्वाभिमान आणि तो भाजपचा मित्र पक्ष म्हणून वावरत होता. आणि मित्र पक्षाकडूनच त्यांना खासदारकी मिळाली होती. परंतु त्याच राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपाने कसा गिळकृत केला? हे राणेंनी पहिल्यांदा जनतेला सांगितल पाहिजे,असा टोला शिवसेना आ.वैभव नाईक यांनी लगावला.
कणकवली येथे आ.वैभव नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भाजपा हे स्वत:चा पक्ष वाढवताना इतर असलेले पक्ष मात्र संपवत आहे, याची अनेक उदाहरणे असताना नितेश राणे आपला पक्ष कसा संपला आणि आपण कसे भाजप मध्ये गेलो,हे आधी जनतेला सांगावे आणि मग दुस-यांवर टिका करावी . दुस-यांचे पक्ष संपवताना आपला कसा गिळकृत केला हे राणेनी लोकांना सांगावे असा टोला आ.नाईक यांनी राणेंनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या टीकेवर उत्तर दिले.