कोकण भवन येथे केला सन्मान
आचरा,दि. ८ मार्च(अर्जुन बापर्डेकर)
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी – २ कोचरा येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी उमेश विठ्ठल पेंडूरकर ,यांना सन २०२० – २१ वर्षातील प्रशासकीय व्यवस्थापनात व विकास कामांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ग्राम विकास विभागातील क्षेत्रीय स्तरावरील तसेच मंत्रालय (खुद्द) येथील गुणवंत अधिकारी / कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला. त्यांना
ग्राम विकास व पंचायत राज विभागाकडून विभागीय आयुक्त (कोकण विभाग) डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग, कोकण भवन यांचे समिती सभागृह सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.यावेळी पेंडूरकर कुटूंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.