राठीवडे नंबर १ शाळेत रंगला महिला मिळावा व होम मिनिस्टर चा सोहळा

आचरा,दि. ८ मार्च(अर्जुन बापर्डेकर)
राठिवडे येथे आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या शांताबाई राठोड तर उपविजेत्या ठरल्या श्रीमती सानवी धुरी .
जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा राठिवडे नंबर १ या शाळेने शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने राठीवडे गावातील महिलांच्या सन्मानार्थ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शाळेत महिला मेळाव्याचे आयोजन केले होते…. महिला मेळाव्याचे उद्घाटन *राठिवडे सरपंच श्रीमती दिव्या धुरी तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. सुभाष धुरी व शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रीमती स्नेहल धुरी व माजी जि. प. अध्यक्ष श्रीम शोभा पांचाळ तसेच प्रमुख पाहुण्या श्रीमती आरती कांबळी व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली सांडव मॅडम यांच्या उपस्थितीत पार पडला……प्राथमिक शिक्षणात माता पालकांचा सहभाग या विषयावर श्रीमती आरती कांबळी यांनी उपस्थित महिला पालकांचे उद्बोधन केले. माता पालकांनी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या पाल्याला कशाप्रकारे शिक्षण द्यावे याचे मार्गदर्शन श्रीमती कांबळी मॅडम यांनी केले.चर्चात्मक चाललेल्या या कार्यक्रमात बहुतांश महिला पालकांनी आपला सहभाग नोंदवला.
महिला पालकांचा शाळेतील सहभाग वाढावा या दृष्टीने शाळा व्यवस्थापन समिती राठिवडे नंबर १ यांच्या सहकार्याने राठीवडे होम मिनिस्टर २०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित माता पालकांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते या सर्व खेळात पालकांनी आपला सहभाग नोंदविला शेवटपर्यंत रंगतदार चाललेल्या या सोहळ्यात राठिवडे होम मिनिस्टर २०२४ पदाच्या मानकरी ठरल्या त्या श्रीमती शांताबाई राठोड तर उपविजेत्या ठरल्या श्रीमती सानवी धुरी …. दोन्ही स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले…. स्पर्धा आयोजनाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. बाळा धुरी यांनी सर्वांचे आभार मानले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री. उत्तम तांबे श्रीमती शितल धुरी व श्री. राजेश भिरवंडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले… होम मिनिस्टर स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या श्रीमती शांताबाई राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “हा विजय माझा एकटीचा नसून समस्त महिला वर्गाचा आहे” असे सांगितले…..