सुंदर हस्ताक्षराचे संस्कार बालवयापासून व्हावेत, रामचंद्र आंगणे सावंतवाडीत प्राथमिक शिक्षकांसाठी हस्ताक्षर सुधार कार्यशाळा संपन्न

सावंतवाडी दि.१४ जानेवारी
सुंदर हस्ताक्षराचे संस्कार बालवयापासून झाले पाहिजेत असे उद्‌गार सावंतवाडी येथील गवाणकर कॉलेज मध्ये शिक्षकांच्या हस्ताक्षर सुधार कार्यशाळेचे उद्‌घाटन करताना उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी काढले
मुलांच्या हस्ताक्षराकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे जाणून शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ यांनी प्राथमिक शिक्षकांसाठी हस्ताक्षर सुधार कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी पंचायत समिती सावंतवाडी व देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज सावंतवाडी यांनी सहकार्य केले होते.

यावेळी व्यासपीठावर आंगणे यांच्या सोबत केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष,माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, गटशिक्षणाधिकारी सौ. कल्पना बोडके, केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर, कमलाकर ठाकूर, म ल, देसाई, सर्वशिक्षा अभियान कार्यालय प्रमुख महेंद्र चव्हाण मार्गदर्शक विकास गोवेकर व संयोजक भरत गावडे होते.

प्रारंभी भरत गावडे यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यामागचा हेतु कथन केला व सर्वांचे स्वागत केले. रामचंद्र आंगणे आपल्या भाषणात पुढे म्हणाले. बालवयात सुंदर हस्ताक्षराचे संस्कार मुलांवर झाले, तर त्यांचा खूप चांगला परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर होतो.तसे झाले नाही, तर मोठेपणी अक्षर सुधारणे कठीण होऊन क्या बसते. राजन पोकळे, कल्पना बोडके, रामचंद्र वालावलकर, शंकर प्रभू, यशोधन गवस आदींनी आपले विचार व्यक्त करुन कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेचे मार्गदर्शक विकास गोवेकर यांनी अल्पावधीत मुलांचे अक्षर सुधारण्यासाठी नेमके काय करावे, याचे स्वानुभवावर आधारीत सविस्तर मार्गदर्शन केले.

शेवटी प्रमोद सावंत यांनी आभार प्रदर्शन केल्यावर कार्यक्रम संपला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत गावडे यांनी केले. या प्रशिक्षणानंतर सुमारे ५५ प्राथमिक शाळांत हा हस्ताक्षर सुधार कार्यक्रम राबवीला जाणार आहे. तदनंतर शिक्षकांची उपक्रम धीच विद्यार्थ्यांची स्पर्धा अहवाललेखन व लेखन हस्ताक्षर स्पर्धा घेतली जाणार आहे. यशाखतांचा सन्मानपत्र देऊन गौरख केळा जाणार आहे.