मळगावमध्ये 27 रोजी जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा

बांदा,दि.१४ जानेवारी
मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात शनिवार दिनांक २७ रोजी सकाळी १० वाजता (कै.) प्राचार्य रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे.
पाचवी ते सातवी गटासाठी ‘शिवरायांच्या पराक्रमच्या कथा ‘ हा विषय ठेवण्यात आला असून वेळ ४ ते ५ मिनिटे देण्यात आला आहे. प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ५५१, ४५१, ३०१ रुपये रोख, प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी १०१ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
आठवी ते दहावी गटासाठी ‘विज्ञान कथा किंवा पर्यावरण कथा’ हा विषय ठेवण्यात आला असून वेळ ५ ते ६ मिनिटे देण्यात आला आहे. प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ७५१, ५५१, ३५१ रुपये रोख, प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी २०१ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. एका शाळेतून जास्तीत जास्त तीन स्पर्धक विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. २६ जानेवारी पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन वाचनालयच्या वतीने करण्यात आले आहे.