हर हर महादेव जयघोषात तेरवण मेढे येथील श्री देव नागनाथ तीर्थक्षेत्र महाशिवरात्री निमित्ताने हजारो भाविकांनी येथील तळीत स्थान करून दर्शनाचा घेतला लाभ

 घाटमाथ्यावरील बसेस रद्द केल्याने हजारो भाविकांची गैरसोय

दोडामार्ग मेढे, दि. ८ मार्च ( तुळशीदास नाईक )
दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे येथील श्री देव नागनाथ तीर्थक्षेत्र हे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून ओळखले जाते, महाराष्ट्र गोवा, कर्नाटक राज्यातील हजारो भाविक महाशिवरात्री निमित्ताने तेरवण मेढे येथील श्री देव नागनाथ तीर्थक्षेत्र या ठिकाणी शुक्रवारी महाशिवरात्री निमित्ताने भेट देऊन येथील तळीत स्थान करून श्री देव नागनाथचे दर्शन घेतले. गुरुवारी रात्री पासून अनेक गावातील भाविक दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळ पासून भाविक तेरवण या ठिकाणी येत होते. या ठिकाणी घाटमाथ्यावरील हजारो भाविक येतात पण राजकीय नेते मंडळी यांच्या सभेसाठी चंदगड आगाराने अनेक बसेस दोन दिवस रद्द केल्याने हजारो भाविकांची गैरसोय झाली. या बद्दल अनेक भक्तांनी चंदगड आकाराच्या तसेच राजकीय नेते मंडळी बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने भाविकांसाठी सरबत व्यवस्था केली होती. आरोग्य केंद्र वतीने भाविकांसाठी सेवा पोलीस तैनात भाविकांच्या रांगा