जेव्हा..खा.विनायक राऊत महादेवाच्या मंदिरात भजनात गजर म्हणतात तेव्हा…

भजनात दत्तगुरूला फुल आवडे गणपतीला दुर्वा शंकराच्या पिंडीवरती बेल शोभे हिरवा..गजराचे गायन ;नाधवडे येथील श्री महादेव मंदिर भजन सादर केलेला व्हिडिओ व्हायरल..

वैभववाडी,दि. ८ मार्च

रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार विनायक राऊत यांनी नाधवडे येथील श्री महादेव मंदिर येथे आज महाशिवरात्र निमित्त मंदिराला भेट देऊन महादेवाचे दर्शन घेतले.

यावेळी शंकर प्रासादिक मंडळ नाधवडे यांच्या वतीने खासदार विनायक राऊत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मंदिरात संगीत भजने चालू असताना तेथील स्थानिक लोकांच्या आग्रहास्तव खासदार विनायक राऊत यांनी स्वतः आपल्या सुस्वर आवाजात महादेवाचा गजर सादर केला .

यावेळी तेथील सर्व भजन रसिक त्यांच्या भजनामध्ये तल्लीन झाले होते. या दर्शनाच्या कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्यासोबत शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके ,युवा सेना तालुकाप्रमुख रोहित पावस्कर , माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, स्थानिक ग्रामस्थ रामचंद्र हळदे, विजय तावडे, विशाल पावस्कर ,मंथन सुतार, कोकिसरे उपविभाग प्रमुख यशवंत गव्हाणकर, खांबाळे उपसरपंच गणेश पवार, युवा सेना समन्वयक दत्तात्रय परब, खांबाळे उपविभाग प्रमुख संघटक जयेश पवार, व इत्यादी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.