तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी माऊली तिरोडा व डिंगडॉनग कारिवडे संघाने उपांत्य फेरीत प्रवेश

सावंतवाडी,दि. ८ मार्च

सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळातर्फे आयोजित केलेल्या तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी माऊली तिरोडा व डिंगडॉनग कारिवडे संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. माउली तिरोडा संघाने माऊली सातोसे संघाचा तर कारीवडे संघाने निरवडे संघाचा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्पर्धेच्या पहिल्या सामन्याची नाणेफेक शिवसेना नेते भय्या सामंत यांच्या हस्ते झाली. सावंतवाडी स्वार हॉस्पिटल समोरील मैदानावर शुक्रवारी झालेले सर्वच सामने चुरशीचे झाले. उद्या शनिवारी तालुकास्तरीय स्पर्धेचा अंतिम सामना तर रविवारी जिल्हास्तरीय स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.
पहिला उपांत्यपूर्व सामना माऊली सातोसे व माऊली तिरोडा संघादरम्यान झाला. प्रथम फलंदाजी करताना सातोसे संघ २८ धावा करू शकला. तिरोडा संघाने शेवटच्या षटकात उद्दिष्ट पूर्ण केले. तिरोडा संघाच्या अक्षय ला सामनावीर पारितोषिक देण्यात आले. दुसरा उपांत्य फेरीचा सामना निरवडे व कारीवडे या दोन संघात झाला. प्रथम फलंदाजी करताना निरवडे संघ ३ षटकात २८ धावाच करू शकला. उत्तरार्धात खेळताना कारिवडे संघाने दुसऱ्या षटकातच उद्दिष्ट पूर्ण करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला.२४ धावा करणाऱ्या शरदला सामनावीर पारितोषिक देण्यात आले. तत्पूर्वी स्पर्धेचा पहिला सामना माऊली सातोसे व सावंतवाडी भटवाडी यांच्यात झाला. सातोसे संघाच्या भेदक गोलंदाजीपुढे भटवाडी संघ केवळ २२ धावाच करू शकला. सातोसे संघाच्या रुपेश साळगावकर, सिद्धेश मांजरेकर व उत्तम सातरडेकर ने प्रत्येकी दोन बळी घेतले. चौथ्या षटकात सातोसे संघाने उद्दिष्ट पूर्ण केले.१० धावा करणाऱ्या निखिल गडेकरला सामनावीर पारितोषिक देण्यात आले.
दुसरा सामना तिरोडा व मळगाव यांच्यात झाला. हा सामना तिरोडा संघाने जिंकला. अक्षय ला सामनावीर पारितोषिक देण्यात आले. मंगलमूर्ती शेरले व तिरोडा यांच्यातील सामना तिरोडा संघाने जिंकला. अक्षयला सामनावीर पारितोषिक देण्यात आले. दुसऱ्या फेरीत सातोसे व तळवणें यांच्यात झालेला सामना सातोसे संघाने एकतर्फी जिंकला.२४ धावा करणारा रुपेश साळगावकरला सामनावीर पारितोषिक देण्यात आले. सालईवाडा व कारिवडे यांच्यातील सामना कारिवडे संघाने जिंकला. साईदत्त सावंतवाडी व निरवडे यांच्यातील सामना कारिवडे ने जिंकला. पियूष ला सामनावीर पारितोषिक देण्यात आले .
स्पर्धेचे समालोचन प्रवीण मांजरेकर, प्रवीण ठाकुर, बाळा आकेरकर यांनी केले. गुणलेखक म्हणून नीतेश गोळवनकर तर पंच म्हणून अरुण घाडी व नीलेश वर्णेकर यांनी काम पाहिले.