तालुकास्तरीय गणित प्राविण्य परिक्षेत इन्सुली नं. ५ शाळेचे यश

बांदा,दि.१४ जानेवारी
सावंतवाडी तालुकास्तरीय गणित प्राविण्य परिक्षेत इन्सुली नं. ५ शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.
सिया विवेकानंद नाईक हिने तालुक्यात द्वितीय तर सोहा इमदाद खान बिजली हिने तालुक्यात चौथा क्रमांक पटकाविला. या यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी वर्गाचे मार्गदर्शक शिक्षक सुधीर गावडे यांचे मार्गदर्शन तसेच भास्कर माजगावकर, हंसराज गवळे व शाळेचे मुख्याध्यापक धनंजय केरकर तसेच इन्सुली केंद्राचे केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर यांचे सहकार्य लाभले.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेकानंद नाईक, उपाध्यक्ष सिद्धी सावंत, प्राधिकरण सदस्य कृष्णा सावंत तसेच सर्व सदस्य व पालक, बांदा प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर व सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी यशस्वी दोन्ही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील गणित प्रज्ञा परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.