जामसंडे पेट्रोल पंपा नजिक दुचाकीची पादचाऱ्याला धडक बसून एक जण ठार…

देवगड,दि.८ मार्च

देवगड हुन जामसंडे कडे जाणाऱ्या दुचाकीची जामसंडे पेट्रोल पंपा नजिक पादचाऱ्याला धडक बसून झालेल्या अपघातात जामसंडे वेळवाडी येथील ६५ वर्षीय अनंत श्रीधर तेली याना गंभीर दुखापत होऊन त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला .ही घटना ८ मार्च रोजी सायं.८.१० च्या सुमारास जामसंडे पेट्रोल पंप नजीक घडली.या घटनेची फिर्याद अभिजित अनंत तेली (३२) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून दुचाकी स्वार दर्शन प्रदीप भोवर रा.जामसंडे विष्णुनगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील दुचाकी स्वार दर्शन प्रदीप भोवर हे आपल्या ताब्यातील दुचाकी टिव्हीएस ज्युपिटर घेऊन देवगड हुन जामसंडे भरधाव वेगाने जात असताना रस्त्याच्या विशिष्ट परिस्थिकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने दुचाकी चालवीत मयत याना जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले प्रकरणी दुचाकी स्वारा वर भादवी कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,मोटर वाहन अधिनियम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाअसून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव करीत आहेत.