कुडाळ ,दि.९ मार्च
कुडाळ शहराच्या मध्यावर्ती ठिकाणि असलेले कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचा कारभार साध्या राम भरोसे सुरु असून या रुग्णालयाला वाली कोण असा प्रश्न निर्माण झालेला आहे .बाह्यरुग्ण तपासणीला डॉ वेळेवर उपस्थित राहत नसल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णाना तासंतास वाट बघावी लागत असल्याने रुग्णाची परवड होत आहे. कुडाळ तहसीलदार कार्यालया शेजारी नविन महिला रुग्णालयाची निर्मिति करण्यात आली.परंतु कुडाळ शहराच्या मध्यावर्ती ठिकाणि असलेल्या ग्रामीण रुग्नालयाचे काय असा सवाल रुग्नामधुन केला जात आहे.