सावंतवाडी,दि.९ मार्च
सांगली येथील नवविद्यालय चा विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचे समजतात सामाजिक बांधिलकीच्या टीम हॉस्पिटलमध्ये पोचून युद्धपातळीवर मदत कार्य सुरू केले. पालकांना धीर देत मुलांना ऍडमिट करण्या करिता मदत कार्य केले तसेच सर्व मुलांना पेज- पाणी उपलब्ध करून दिले त्याचप्रमाणे पालक, डॉक्टर, सिस्टर व सर्व कर्मचाऱ्यांना रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली यासाठी सामाजिक बांधिलकीच्या समीरा खालील,रवी जाधव व एडवोकेट बापू गव्हाणकर यांनी मदत केली तसेच आज सकाळी पालक, विद्यार्थी डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी कॉफी व बिस्कीटची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे बाळू भटजी यांच्या मदत सहकार्याने दुपारी मुलांना, पालकांना डॉक्टर व सर्व कर्मचाऱ्यांना उपीट दिलं. सामाजिक बांधिलकीचे निस्वार्थ व प्रामाणिक कार्य पाहून उपस्थित डॉक्टर, पालक व जिल्हा चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील भारावून गेले व सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांचे तोंड भरून कौतुक केले. या मदत कार्यासाठी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव,रुपा मुद्राळे, अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, दीपक सावंत,शिवम सावंत, सुजय सावंत, लक्ष्मण कदम, अशोक पेडणेकर, रमिजा दुर्वेश, रुपेश राठोड, बाशीर यांनी सामाजिक मदत कार्य करून कौतुकाची थाप मिळवली.