भारतीय बौद्ध महासभा शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने मालवणात उद्या धम्म परिषदेचे आयोजन

मालवण,दि.९ मार्च

भारतीय संविधान दिन अमृतमहोत्सवी वर्ष २०२४ निमित दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने १० मार्च रोजी सकाळी ९.३० ते ५ या वेळेत येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेस दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, जागतिक बौद्ध संघटना सचिव डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत

याबधम्म परिषदेच्या पहिल्या सत्रात सकाळी १० वा. कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला ट्रस्टी चेअरमन तथा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, जागतिक बौद्ध संघटना सचिव डॉ. बी. आर. आंबेडकर, मल्टी स्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण, रॅली- मालवण देऊळवाडा ते कार्यक्रमस्थळ, १०.३० वा सुत्रसंचालन-राजेश कदम, उद्द्घाटन, प्रतिमांना पुष्पहार अर्पण, दीप प्रज्वलन, त्रिसरण पंचशील संविधान उद्देशिका वाचन, बुद्ध, भीमगीत गायन, स्वागत समारंभ, प्रास्ताविक – महासचिव आनंद धामापूरकर, सामूहिक धम्म दिक्षा, ११ वा. तालुका अध्यक्ष, सचिव यांच्याकडून शुभेच्छा.

यावेळी विधीज्ञ बी. टी. शेंडे (राष्ट्रीय महासचिव), शशिकांत जाधव (राष्ट्रीय कोषाध्यक्ष), दिनेश हनुमंते (राज्याध्यक्ष), सिद्धार्थ गायकवाड (राज्य महासचिव), रविकांत जाधव (राज्य संस्कार विभागप्रमुख), वैभव थबडगे (राज्य मुख्य संघटक), एम. डी. कांबळे (कोकण विभाग अध्यक्ष), विद्याधर धोडू कदम (धम्म परिषद अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष), दुपारी ११.४५ वा. प्रमुख मार्गदर्शक डॉ. बी. आर. आंबेडकर व डॉ. राजरत्न आंबेडकर यांचे मार्गदर्शन होणार आहे.

दुसऱ्या सत्रात धम्म प्रवचन व सत्कार सोहळा-दुपारी २.३० वा. धम्मदेसना व धम्म प्रवचन-भंते सचित बोधी, ३.३० वा. मी सावित्री बोलतेय (आर्या किशोर कदम, कणकवली, कलमठ), ३.४० वा. मी रमाई बोलतेय (मिताली आनंद कदम, पियाळी कणकवली), ३.५० वा. सत्कार (जिल्हा व तालुका पदाधिकारी), सायंकाळी ४ वा. विविध ठरावांचे वाचन, ४.३० वा. आभार – हेमंतकुमार तांबे (जिल्हा उपाध्यक्ष).

यावेळी जिल्हा कार्यकारिणी-विद्याधर कदम (जिल्हाध्यक्ष), आनंद थामापूरकर (महासचिव), सूर्यकांत बिबवणेकर (संस्कार विभागप्रमुख), सुशिल कदम (पर्यटन विभागप्रमुख), सुरेश कदम (पर्यटन विभाग सचिव), पुरुषोत्तम मालवणकर, विद्यानंद शिरगावकर (संघटक), हेमंतकुमार तांबे (उपाध्यक्ष), नंदकुमार कासले (कोषाध्यक्ष), आनंद कदम (प्रवक्ता), प्रवीण कदम (संपर्कप्रमुख), संजय पाटील, विष्णू अणावकर, चंद्रकांत जाधव (संघटक), सुनीता कदम (उपाध्यक्षा), दीपक जाधव (मुख्य संघटक), सुहास कदम (प्रसिद्धीप्रमुख), राजेंद्र कदम (संरक्षण विभागप्रमुख), चंद्रकांत जाधव (मळगाव संघटक), सुधीर पालकर, भगवान जाधव (संघटक) उपस्थित राहणार आहेत. तालुका कार्यकारिणी-कुडाळ- हरिश्चंद्र कदम (अध्यक्ष), भिकाजी कदम (सचिव), रघुनाथ सोनवडेकर (कोषाध्यक्ष), मालवण-सिद्धार्थ जाधव (अध्यक्ष) गंगाधर कदम (सचिव), विलास नाईक (कोषाध्यक्ष), दोडामार्ग हरिश्चंद्र मणेरीकर (अध्यक्ष), शंकर जाधव (सचिव), आनंद सम्राट (कोषाध्यक्ष), कणकवली-अनिल तांबे (अध्यक्ष), किशोर कदम (सचिव), सुनील कदम (कोषाध्यक्ष), वेंगुर्ले लाडू जाधव (अध्यक्ष), यशवंत मठकर (सचिव), रामचंद्र जाधव (कोषाध्यक्ष), सावंतवाडी- अॅड. अशोक जाधव (अध्यक्ष), राकेश जाधव (सचिव), दशरथ कांबळे (कोषाध्यक्ष) मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.