कणकवलीत मिळून साऱ्याजणी महिला मंचाच्या वतीने कर्तुत्वान महिलांच्या सन्मान ; जागतिक महिला दिन उत्साहात
कणकवली दि.९ मार्च ( भगवान लोके )
कणकवलीत महिलांसाठी कार्यरत असणा-या निलम पालव सावंत या गेल्या २१ वर्षापासून महिला दिनाचा कार्यक्रम घेत आहेत. मिळूनी सा-याजणी महिला मंच हा महिलांना व्यासपीठ मिळवून देत आहे. महिलांना समाजात पुढे आणण्याचे काम या महिला मंचाच्या माध्यमातून होत आहे , त्याचा आम्हाला अभिमान आहे. या महिला दिनाच्या निमित्ताने कर्तुत्वान महिलांच्या पाठीवर थाप मारण्याचं काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन शिवसेना खा. विनायक राऊत यांनी केले.
कणकवली येथे आयोजित उद्योगिनी व कर्तुत्वान महिलांचा सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी आम. वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , तालुका प्रमुख प्रथमेश सावंत , उत्तम लोके, निलम पालव सावंत , समृध्दी पारकर , शितल पारकर, अमिता सावंत, माधुरी कोदे सेजल पारकर, राधिका पालव, अलका गाड, अंजली घवाळी, प्रीती म्हापसेकर, निधी निखार्गे, नेहा पारकर, मंगल पाटकर, तन्वी पारकर,अनिता धामापूरकर, परी साळगावकर यांच्या सह महिला उपस्थित होत्या.
मिळून साऱ्याजणी महिला मंचाच्या वतीने उद्योगिनी पुरस्कार – शितल मेस्त्री ( उद्योगिनी क्लिनिंग प्रोडक्ट च्या चालक-मालक ) , कर्तुत्ववान महिला – प्रमिला पोमिंगल,( भाजी विक्रेते ) , ॲड. मेघना सावंत ( महिला सल्लागार ) , अंकिता नाईक – (सिनेकलाकार) , पूजा वाडकर – (मालवण येथील उद्योगिनी) , रूपा कदम- ( माथाडी कामगार, मजूर यांच्यासाठी काम ) , आकांक्षा शिरपुटे – (मालवण नगरसेविका ) अक्षता कांबळी – ( सिने कलाकार ) यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
चार्मिंग लेडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम विजेती – सौ.दीपिका फर्नांडिस , उपविजेती -सौ. सुरेखा कट्टीमणी , वक्तशीर- सौ.दिव्या दिनेश साळगावकर, विशेष बुद्धिमान – सौ. प्रियाली आजरेकर, बेस्ट कॅटवॉक -सौ. प्रतिज्ञा अहिरे, चार्मिंग लेडी विशेष – सौ सुप्रिया तेली, सहभाग सौ लता पाटील, सौ सुप्रिया सरंगले, या स्पर्धेचे परीक्षक -सौ सुमन दिनेश कदम , कोरिओग्राफर -संतोष पुजारे यांनी काम पाहिले.
पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांनी उपवासाचे पदार्थ स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम – सौ.रश्मी राजेंद्र माणगावकर , द्वितीय – सौ.मानसी मकरंद आपटे , तृतीय – सौ. गौरी गणेश तारळेकर परीक्षक – श्री निनाद पारकर यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमात रोहिणी पिळणकर निलम,पिळणकर, शारदा पिळणकर, साधना म्हस्कर,रसिका पारकर हर्षदा पिळणकर, पूर्वा पिळंणकर गीता पिळणकर, श्रावणी पिळणकर, धनश्री गुरव, साक्षी आमडोस्कर, आर्या पोयेकर, पुनम हजारे आदी महिला कलाकार सहभागी झाले होते.
या महिलांनी रसिका साटम, रीमा साटम,दर्शना राणे संजना साटम, सुविधा राणे,स्वाती गोखले,मीनल मर्गज, सुचिता सोनी, रोहिणी मलये, रीया गवंडी, माधुरी पवार, वेदश्री बाणावलीकर , गीता डावरे श्रावणी कोकरे, नेहा कांबळे, श्वेताली मोरे,पूजा शिंदे, स्वरा कोकरे,सानिका गुरखे, सविता पाटील, सारा खांडवी, सुरभी खांडवी, आर्या कांबळे, साक्षी पाटील, शितल सावंत, पूजा परब भाग्यश्री रासम, सुमेधा काणेकर, स्मिता बुटाले,सुखदा गांधी, स्मिता वालावलकर, रेश्मा वालावलकर, तेजल लिंग्रस,नीता मयेकर, दीपा सरुडकर, रुचिरा वर्णे,श्वेता घाणेकर, नूतन दळवी,युगा दळवी,सविता सुतार, साक्षी टोणेमारे उपस्थिती दर्शवली.