बांदा,दि.९ मार्च
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १८ वा वर्धापन नाशिक येथे साजरा होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी पक्ष स्थापन केला आज १८ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी तालुक्याच्या वतीने इन्सुली डोबाशेळ येथील फ्रान्सिस्कॅन मिशनरीझ ऑफ ख्रिस्त- द- किंग संस्थेतील अपंग, मूकबधिर विद्यार्थी यांना जीवना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष केतन सावंत, माजी परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, सावंतवाडी उपतालुकाध्यक्ष अतुल केसरकर, सुनील आसवेकर, सावंतवाडी उपशहरअध्यक्ष सिद्धेश आकेरकर, न्हावेली पंचायत विभाग अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर, साई तळकटकर, जय सावंत तसेच संस्थेचे श्रीमती ब्रीजट वार्घेस,ॲटोंनिती लोपस, पेन्ड्रिन्टा वाझ उपस्थित होते यावेळेस संस्थेच्या श्रीमती रेखा यादव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले व विद्यार्थ्यांची संवाद साधला संस्थेच्या काही मागण्या आहेत या ठिकाणी येण्या जाण्यासाठी संस्थेला रस्ता नाही नीटपणे कालव्याच्या रस्त्याने वाहतूक करावी लागते त्याचप्रमाणे बस थांबा नाही अशा विविध मागण्या त्यांनी सांगितल्या त्याचप्रमाणे संस्थेतील मुलं ही१८ वर्षावरील आहेत तसेच त्यांना मेणबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिलं जातं विविध उपक्रम संस्था राबवते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदास गवंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेच्या रेखा यादव यांनी केले.