सावंतवाडी दि.९ मार्च
सावंतवाडी मध्ये मंजूर झालेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असते तर अन्नातून विषबाधा झाल्यानंतर विद्यार्थांची गैरसोय झाली ती झाली नसती असे ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी म्हटले आहे. मंत्री केसरकर अजून किती काळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भूलथापा मारणार आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सावंतवाडी येथील जनतेच्या समस्या मंत्री केसरकर यांना कधी दिसणार आहेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तर दीपक केसरकर कधी देणार आहेत असा सवाल उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केला. तर नवोदय विद्यालयात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. येथील प्रशासनानं योग्यवेळी माहिती न दिल्यानं धावपळ झाली. वेळेत उपचार मिळाले असते तर विषबाधीतांचा आकडा वाढला नसता असं रूपेश राऊळ म्हणाले.
ते म्हणाले, अन्नातून विषबाधा होऊन गंभीर परिस्थितीला नवोदयच्या विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सुदैवाने विद्यार्थी यातून सुखरूप बाहेर पडत आहेत. कालची परस्थिती पाहिली तर विद्यालयाचा निष्काळजीपणा यात दिसून आला. पालक व प्रशासनाला कोणतीही कल्पना विद्यालय प्रशासनान दिली नाही. योग्यवेळी माहिती दिली असती तर धावपळ कमी झाली असती. योग्यवेळी उपचार मिळाले असते तर संख्या वाढली नसती. विद्यालयाचे जबाबदार लोक जबाबदारपणे न वागल्यान बारा तास वाया गेले. उपजिल्हा रूग्णालयात या विद्यार्थ्यांना दाखल केले. उपचारासाठी पळापळ करावी लागली पूर्णतः सुविधा नव्हत्या. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली. तर आरोग्य सुविधांसाठी येथील अपघातातील रूग्णाला गोवा बाबुळींला जाव लागत. गोव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक युवतींचे अपघात होऊन जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे मंत्री दीपक केसरकर यांचे डोळे उघडणार कधी? याची जबाबदार कधी उचलणार की केवळ गप्पा मारणार? असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केला. येथील जनता हे प्रश्न विचारत आहेत की केसरकर विकास कधी करणार आहेत. दीड वर्ष हॉस्पिटलच्या प्रतिक्षेत लोक आहेत. मात्र, केसरकर तारखा देण्यात मग्न आहेत. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे आता केसरकरांना द्यावीच लागतील अन्यथा जनता त्यांना नक्की उत्तर देणार असा इशारा रूपेश राऊळ यांनी दिला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, उपतालुकाप्रमुख संदीप माळकर, विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ, अशोक परब, अजित सांगेलकर आदी उपस्थित होते उपस्थित होते.