दोडामार्ग, दि. ९ मार्च
गोवा दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग असलेल्या तिलाही घाटात अवजड वाहनांमुळे वारंवार अपघात होऊन घाट बंद होणे प्रवासी वाहन धारकांची गैरसोय होणे या घटना सतत घडत असताना चंदगड बांधकाम विभाग गेल्या दिड वर्षात यावर काही उपाययोजना करु शकले नाही . चंदगड बांधकाम विभाग येथील अधिकारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे शनिवारी तिलाही घाटात जयकर पाॅईट येथे धोकादायक उतार वळण येथे आयशर टेम्पो कठड्याला धडकून पलटी झाला सुदैवाने कुणी जखमी झाले नाही पण वाहनाचे नुकसान झाले. दुपारी हा अपघात झाला. चंदगड बांधकाम विभाग येथील बेजबाबदार अधिकारी यांची तातडीने उचलबांगडी करावी अशी मागणी केली जात आहे.