आनंदव्हाळ-कातवड-नांदरुख व खैदा-साळकुंभा-नांदरुख रस्ताकामांचा शुभारंभ

मालवण,दि.९ मार्च

मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ- कातवड-नांदरुख आणि खैदा-साळकुंभा-नांदरुख हे दोन रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शासनाच्या माध्यमातून मंजूर केले आहेत. या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ श्री देव गिरोबा मंदिर समोरील मार्गांवर जेष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

या दोन्ही रस्त्यांसाठी साडेचार कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर झाला आहे. गावातील ग्रामस्थ, महिला भगिनी या या सर्वांच्या मागणी पाठपुराव्यातून अखेर रस्ता काम मंजूर झाले आहे, अशी माहिती सरपंच रामचंद्र (भाऊ) चव्हाण यांनी दिली.

यावेळी नांदरुख सरपंच रामचंद्र (भाऊ) चव्हाण, कातवड सरपंच प्रतीक्षा हळदणकर, उपसरपंच गणेश चव्हाण, माजी सरपंच विलास मांजरेकर, भाऊ बापू चव्हाण, धनंजय चव्हाण, गोविंद चव्हाण, काशिनाथ चव्हाण, रमेश वस्त, संतोष चव्हाण, संजय चव्हाण, महेश चव्हाण, दाजी चव्हण, दीपक चव्हण, महादेव चव्हण, मिलिंद चव्हाण, शुभम चव्हाण, रसिका चव्हाण, प्रणाली चव्हाण, सुचिता चव्हाण, सुजाता चव्हाण, स्वरा चव्हाण, अद्विका चव्हाण, भारती चव्हाण, प्रिया चव्हाण, प्रिया चव्हाण, पुष्पा चव्हाण, विजया चव्हाण, चैताली चव्हाण, राधा चव्हाण, जान्हवी चव्हाण, अश्विनी चव्हाण, रेश्मा चव्हाण, मेघा चव्हाण, मंदा चव्हाण, दिव्या चव्हाण, ठेकदार आशिष परब यांसह नादरुख, साळकुंभावाडी, कातवड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.