गद्दारांना धडा शिकवायचा कामाला लागा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचा-खा.विनायक राऊत

सावंतवाडी,दि.१४ जानेवारी
गद्दारांना धडा शिकवायचा आहे. कामाला लागा, १५ फेब्रुवारी पर्यंत आचारसंहिता लागणार, त्यामुळे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचा,असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले

दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आढावा घेतला यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख शैलेश परब जिल्हाप्रमुख संजय पडते जिल्हा समन्वयक बाळा गावडे अतुल रावराणे युवा सेना जिल्हाधिकारी मंदार शिरसाट सावंतवाडी तालुका संपर्कप्रमुख राजू नाईक
तालुका प्रमुख रुपेश राऊळ, यशवंत परब संजय गवस दोडामार्ग वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्यातील महिला पदाधिकारी आदीसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी खासदार राऊत म्हणाले की निवडणुका जवळ आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ही जागा जिंकायची आहे. त्यामुळे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून आपण पाच वर्षात केलेले काम पटवून सांगा. काहीजण निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून खोटी आश्वासन देतील. त्यामुळे अशा भूलथापांना बळी न पडता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे रहा ,असे आवाहन तुम्ही जनतेला करा अशा सूचना देखील विनायक राऊत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.
सावंतवाडी येथील हॉटेल मध्ये झालेल्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक प्रश्न उपस्थित केले यावेळी पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाणार असून कोणत्याही परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी शिवसैनिकानी एकजुटीने कामाला लागा असे आवाहन खासदार राऊत यांनी केले