लोरे नं १ गावात विकास कामांचा धडाका..

आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत विकास कामांची भूमिपूजने

कणकवली दि.१० मार्च(भगवान लोके)

लोरे नं १ गावातील आ.नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
ग्रामपंचायत लोरे नं १ माजी सभापती मनोज तुळशीदास रावराणे यांच्या पाठपुराव्यामुळे कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघांचे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून लोरे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले.

त्यात आद्य देवस्थान श्री. देव गांगो रुजेश्वर मंदिरातील परिसर सुशोभीकरण करणे यासाठी रु.२५ लाख निधी, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष तुळशीदास रावराणे यांच्या पाठपुराव्यामुळे लोरे तलाठी कार्यालयाला रु.२५ लाख चा निधी, ( या कार्यालयासाठी श्री तुळशीदास रावराणे यांनी आपल्या स्वतःच्या मालकीची जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिली) व लोरे नं १ कुंडलवाडी रस्त्यासाठी रु.४०लाखांचा निधी प्राप्त झाला होता. या कामांचे भूमिपूजन कार्यसम्राट आम. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या उद्घाटन प्रसंगी सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष तुळशीदास रावराणे,राजन चिके,कणकवली माजी सभापती मनोज रावराणे,भाजपा ग्रामिण तालुका अध्यक्ष संतोष कानडे,लोरे सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव,भाजपा शक्ती केंद्र प्रमुख नरेश गुरव, व गावातील बहुसंख्य ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

लोरे गावाच्या विकासा साठी सदैव व तत्परतेने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार नितेश राणे यांचे आभार सरपंच अजय तुळशीदास रावराणे यांनी मानले.