सावंतवाडी, दि.१० मार्च
येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट व ड्रगीस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा केमिस्ट व ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, पॉलिटेक्निक प्राचार्य गजानन भोसले, विभागप्रमुख प्रा.ओंकार पेंडसे आदी उपस्थित होते.
स्पर्धेत विविध जिल्ह्यातील एकूण अठरा गटांनी सहभाग घेतला. यापैकी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या अनिकेत चोपडे व विनय खरात यांनी प्रथम, संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, महागावच्या स्नेहल बामणे व पूजा सुतार यांनी द्वितीय तर यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी. फार्मसीच्या दिप्ती पिंगुळकर व पूनम वराडकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सुनेत्रा फाटक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
परीक्षक म्हणून प्रा.संदेश सुळ, प्रा.सिल्वी गोन्साल्वीस, प्रा.गायत्री आठलेकर व प्रा.गौरी भिवशेठ यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन सुप्रिया राऊळ तर आभार प्रदर्शन नेहा मडगावकर यांनी केले.