भावोजी प्रा. रूपेश पाटील आणणार कार्यक्रमात रंगत..!
सावंतवाडी, दि.१० मार्च
सातोसे महिला ग्रुप व ग्रामस्थांच्या संयुक्त
विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आज सायंकाळी ५ वाजता खास महिलांसाठी ‘ खेळ पैठणीचा’ हा धमाल कार्यक्रम संपन्न होणार असून कोकणचे लाडके भावोजी प्रा. रूपेश पाटील यांच्या बहारदार व ज्ञानवर्धक सूत्रसंचालनाने कार्यक्रम रंगतदार होणार आहे.
काल शनिवार ९ मार्चपासून कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवार ९ मार्चला दुपारी २.३० वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, प्रथम पारितोषिक ३०० रुपये, द्वितीय २०० रुपये, मुलींसाठी प्रथम पारितोषिक ३०० रुपये, द्वितीय २०० रुपये. तर कष्टकरी महिला पुरस्कार देण्यात आलेत.
आज रविवारी १० मार्चला दुपारी १ वाजता महिला दिन कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व सत्कार समारंभ, प्रमुख वक्ते लाडू पवार यांचे व्याख्यान, दुपारी २ वाजता वेणी स्पर्धा, दुपारी तीन वाजता गावातील महिलांची नाटिका, प्रथम पारितोषिक ७०० रुपये, द्वितीय ५०० रुपये, सायंकाळी चार वाजता मंगळागौर स्पर्धा, प्रथम पारितोषिक दोन हजार रुपये, द्वितीय १५०० रुपये, तृतीय एक हजार रुपये, सायंकाळी पाच वाजता महिला ग्रुप डान्स, प्रथम पारितोषिक ७०० रुपये, द्वितीय ५०० रुपये, सायंकाळी सहा वाजता संगीत खुर्ची, ७ वाजता खेळ पैठणीचा – सातोसे गाव मर्यादित, प्रथम पारितोषिक दोन हजार रुपये, द्वितीय १५०० रुपये, तृतीय १००० रुपये अशी पारितोषिके आहेत. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच प्रतीक्षा मांजरेकर व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.