कासार्डे येथील राजा शिवछत्रपती ग्रुप व नवतरुण उत्कर्ष मंडळ कासार्डेच्या वतीने रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन

तळेरे, दि.१० मार्च

कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील राजा शिवछत्रपती ग्रुप व नवतरुण उत्कर्ष मंडळ कासार्डेच्या वतीने शिवजयंती (तिथीनुसार) निमित्त गुरूवार दि. २८ मार्च २०२४ रोजी खुला गट समुह नृत्य स्पर्धा, कासार्डे गाव मर्यादित रस्सीखेच स्पर्धा व जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरूवार दि २८ मार्च रोजी सकाळी १०:०० वा. खुला गट समुह नुत्यृ स्पर्धा शाळा/महाविद्यालय/ग्रुप याच्यासाठी असून प्रथम क्रमांक रोख दहा हजार व सन्मानचिन्ह,व्दितीय क्रमांक रोख पाच हजार व सन्मानचिन्ह,तृतीय क्रमांक रोख तीन हजार व सन्मानचिन्हासह सहभागी प्रत्येक संघास मानधन व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. समूहनृत्य स्पर्धेसाठी नृत्य छत्रपती शिवाजी महाराज जीवनावर/प्रभु श्रीराम याच्या जीवनावर/लोककला नृत्य प्रकार असणे गरजेचे आहे.

तर सायं. ६ वा. कासार्डे गाव वाडी मर्यादित रस्सीखेच स्पर्धा होणार असून यासाठी प्रथम क्रमांक रोख तीन हजार व सन्मानचिन्ह,व्दितीय क्रमांक रोख दोन हजार व सन्मानचिन्ह तर रात्रौ ८:०० वा. जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रोख पाच हजार व सन्मानचिन्ह, व्दितीय क्रमांक रोख तीन हजार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.रस्सीखेच संघात आठ खेळाडू सहभागी होऊ शकत असून सर्व स्पर्धाच्या सहभागासाठी सहदेव उर्फ आण्णा खाडये ,मोबा. 9405358272, रमेश मुणगेकर,मोबा. 9890171449,
गुरूप्रसाद सावंत, मोबा.940335 1474, किरण मुणगेकर मोबा.9922 971775 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन राजा शिवछत्रपती ग्रुप व नवतरुण उत्कर्ष मंडळ कासार्डेच्या वतीने करण्यात आले आहे.