यात्रा कालावधीमध्ये कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व स्वयंसेवकांकडून भाविकांना आदराची वागणूक…
देवगड, दि.१० मार्च (गणेश आचरेकर)
दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेची देवस्वारी तिर्थस्ना व भाविकांच्या पवित्र समुद्र स्नानाने सांगता झाली. गेले तीन दिवस भाविकांनी यात्रेला उच्चांकी गर्दी केली होती शुक्रवारपासून सुरू झालेल्या यात्रेची सांगता तिसऱ्या दिवशी पवित्र तीर्थ स्नानाने झाली यात्रेच्या तिसऱ्या दिवशीही भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला होता कुणकेश्वर भेटीसाठी जिल्ह्यातून मुणगे, नारिग्रे, कणकवली गावासह एकूण सहादेव देव साऱ्या कुणकेश्वराच्या भेटीसाठी आल्या होत्या या देवस्वारांनी रविवारी पहाटेपासूनच समुद्रात तीर्थस्नाला जाण्यास सुरुवात केली देवसाऱ्यांबरोबरच तिर्थस्नान करण्यासाठी लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती.यात्रा कालावधीमध्ये कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व स्वयंसेवकांकडून भाविकांना आदराची वागणूक दिली जात होती.
पहाटे तीन वाजल्यापासून समुद्रकिण्यावर धार्मिक विधींना प्रारंभ झाला देवस्वारी व भाविकांच्या तीर्थस्नान यावेळी समुद्रकिनारी सुरक्षारक्षक ठेवण्यात आले होते आपत्ती व्यवस्थापन विभाग पोलीस स्वयंसेवक समुद्रकिनारी सज्ज होते तीर्थस्थान करताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मंदिर व्यवस्थापन व प्रशासनामार्फत दक्षता घेण्यात आली होती. देवस्वाराने तीर्थस्थान करून व देवदर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला रविवारी देखील भक्तांनी कुणकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे तिसऱ्या दिवशीही व्यापारी बंधूनी दुकाने सुरू ठेवली आहोटी तीन दिवस सुरू असलेल्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले तर कोट्यावधी रुपयांची उलाढाल देखील झाली.
कुणकेश्वर येथे थाटण्यात आलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये रविवारी तिसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली यात्रा शांततेमध्ये सुरळीत पार पडावी यासाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट प्रशासनाकडून यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी चांगले प्रयत्न केले यावर्षी भाविकांना दर्शनाची व्यवस्था चांगल्या प्रकारे केल्याबद्दल तसेच यात्रेचे चांगल्या पद्धतीने नियोजन केल्याबद्दल देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थेबाबत तसेच देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी व भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.