ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुकाच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान

सावंतवाडी, दि.१० मार्च

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्याच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सावंतवाडी तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संघटनेच्या वतीने वेंगुर्ला मातोंड सरपंच- मयुरी वडाचे पाटकर, सर्पमित्र- नवीध हेरेकर, सावंतवाडी रेल्वे स्टेशन मास्तर- प्रतीक्षा गावकर, पोलीस शिपाई- ज्योती दूधवडकर, अश्विनी लेले यांचा शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी संघटनेच्या जिल्हा महिला संघटक- सौ.शिवानी पाटकर, तालुकाध्यक्ष- तन्वीर खतीब, कार्याध्यक्षा- सौ.मोहिनी मडगावकर, तालुका महिला संघटक- सौ.अवंती पंडित, सदस्या- सौ.मेघना साळगांवकर, भारती परब, सुप्रीता धारणकर, चलवाडी मॅडम, श्वेता कांबळे, कृष्णा गवस त्याचप्रमाणे अन्य पदाधिकारी तसेच सावंतवाडीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.