देवगड,दि.१० मार्च
मिठबाव खालची नरेवाडी येथील रामदास पडवळ यांच्या गोठ्याला अचानक आग लागल्याने गोठ्यामधील चार जनावरे पूर्ण दगावली आहेत. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच मिठबाव सरपंच भाई नरे, उपसरपंच फाटक, पोलीस पाटील जयवंत पाटील,तलाठी नाईक,शैलेश लोके यांच्यासह ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळवले.मात्र तीन जनावरे या दुंर्घटनेत दगावल्याने शेतकरी रामदास पडवळ यांचे मोठे नुकसान झाले आहे.