मसुरे,दि.१४ जानेवारी(झुंजार पेडणेकर)
मालवण तालुक्यातील
बांदिवडे पालयेवाडी ते त्रिंबक रस्त्यावर पडलेले खड्डे बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या सदस्यांनी श्रमदान करत बुजवले. सदर रस्त्याची मागील आठ ते दहा वर्षे कोणतीही डागडुजी झालेली नाही आहे. त्यामुळे मोठ-मोठे खड्डे पडले होते. सदर मार्गावरून बांदिवडे येथुन अनेक विध्यार्थी शाळेत जाण्यासाठी नेहमी प्रवास करतात. तसेच छोट्या वाहनांची मोठी वर्दळ सुद्धा या रस्त्यावर असते. खड्डे पडल्याने वाहतूक करणे धोकादायक बनले होते. वेळो वेळी पत्र- व्यवहार करून सुद्धा उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहत खड्डे बुजवले. यावेळी
आनंद परब, विलास परब, उदय सावंत, प्रशांत परब, अजय घाडीगावकर, प्रफुल्ल प्रभू, उमेश परब, प्रकाश घाडीगावकर, रामचंद्र माळकर, संदीप घाडीगावकर, केशव परब, संदीप आईर, संतोष आईर, किरण पवार, संजय जोशी, संतोष कडू, हर्षल प्रभू, आनंद राणे, मंगेश राणे, लक्ष्मण मेस्त्री, दीपक परब, महेंद्र हीर्लेकर, भुवन परब, चंद्रकांत परब, रंजन प्रभू, हनुमंत आईर, दिनेश मयेकर, शुभम घाडी, तुकाराम घाडीगावकर, विजय घाडीगावकर, खेमजी घाडीगावकर, अजय घाडीगावकर, गोपाळ परब, विनय घाडीगावकर, पुष्पक घाडीगावकर, नारायण परब, सुधीर घाडीगावकर, राजेश घाडीगावकर, हरेश परब, प्रसाद घाडी, विलास घाडी, प्रणय घाडीगावकर आदी ग्रामस्थ, सदस्य उपस्थित होते. संघाच्या वतीने अध्यक्ष आनंद परब यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.