काजूला राज्य सरकारने दोनशे रुपये हमीभाव दिलाच पाहिजे

स्वामीनाथन आयोग लागू या मागणीसाठी दोडामार्ग चौकात शेतकरी बांधवांचे चक्काजाम आंदोलन चारही रस्त्यावर वाहनांच्या रांगा

दोडामार्ग, दि.१० मार्च 

सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यातील काजू बागायतदार शेतकरी यांच्या काजूला योग्य दर मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अनेक सुरक्षित तरुणांनी नोकरी न करता पंधरा ते वीस एकर जागेत काजू लागवड केली. गेल्या दोन वर्षांपासून काजूला योग्य दर मिळावा अशी मागणी करून देखील राज्य सरकार लोकप्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बागायतदार यांच्या मागणीकडे दूर्लक्ष करत आहे. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील काजू बागायतदार शेतकरी बांधवानी रविवारी दोडामार्ग मध्ये रॅली काढत दोडामार्ग गांधी चौकात जवळपास वीस मिनिटे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले या आंदोलन मुळे चारही रस्त्यावर वाहने अडकून पडली. वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांना बरेच परिक्षम घ्यावे लागले.
यावेळी जोरदार घोषणा करत दोडामार्ग पिंपळेश्वर चौक दणाणून सोडला. शेकडोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.