कायद्याच्या चाकोरीत राहूनच कारभार करा कुठल्याही अडचणी येणार नाहीत-श्रीमती मधुमिता निकम

सावंतवाडी ,दि.१० मार्च

संस्थानचे रेकॉर्ड चांगले ठेवा संस्थांची इतिवृत्त वार्षिक सर्वसाधारण सभा या सर्वांची अत्यंत काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करा आणि जर का तुम्ही संस्थानचे कागदपत्र योग्य पद्धतीत असतील तर निश्चितपणे त्या संस्थांची चेंज रिपोर्ट कधीही रोखले जाणार नाहीत विनाकारण संस्थांचे घटना बदल अथवा इतर कामकाज कधीही रोखले जात नाहीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संस्थानी आपला कारभार स्वच्छ आणि कायद्याच्या चाकोरीतच राहून करायला हवा मग तुमचे कुठलेही काम असो सहाय्यक धर्मादाय आयुक्त कडे कधीच थांबणार नाही तुम्ही फक्त संस्थांचे काम करताना संस्थांची कागदपत्रे नीटनेटकी आणि व्यवस्थित कायद्याच्या चाकोरीत राहूनच कारभार करा कुठल्याही अडचणी येणार नाहीत असे मत सहाय्यक धर्मादाय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सिंधुदुर्गच्या श्रीमती मधुमिता निकम यांनी व्यक्त केले ओरस येथे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व रा ब अनंत शिवाजी देसाई वाचनालय पोरस यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे कार्यकर्ते कर्मचारी यांना एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचे उद्घाटन सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती मधुमिता निकम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के अनंत देसाई वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश जैतापकर जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ उपाध्यक्ष धाकू तानावडे सहसचिव महेश बोवलेकर जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक एडवोकेट नंदन वेंगुर्लेकर एडवोकेट संतोष सावंत उपाध्यक्ष संचालक संजय शिंदे संजय वेतुरेकर जयेंद्र तळेकर सतीश गावडे दीक्षा परब ऋतुजा केळकर गुरुनाथ मढव प्रवीण भोगटे देसाई वाचनालयाचे सचिव रोहिदास राणे संजय परब पावलो फर्नांडिस उदय दळवी उदय जांभवडेकर पीएन मटकर बबन सावंत आधी उपस्थित होते यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती मधुमिता निकम पुढे म्हणाल्या संस्था व त्यांची घटना बदल तसेच सभासद कमी करणे आदींबाबत अनेक प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडे येत असतात परंतु सदरचे प्रस्ताव हे अपूर्ण अवस्थेत असतात तुम्ही जर व्यवस्थित कायद्याच्या चाकोरीत राहून ते प्रस्ताव आमच्याकडे सादर केला तर निश्चितपणे तुमचे सर्व प्रस्ताव मंजूर केले जातील परंतु तुमचे प्रस्ताव जर आणि संस्थेचे रेकॉर्ड जर योग्य नसेल तर कसे काय आम्ही प्रस्तावना मंजुरी देऊ त्यासाठी तुम्ही संस्थेचे रेखावृत्त आणि चांगले ठेवा विनाकारण तुमचे घटना बदल चेंज रिपोर्ट चे प्रस्ताव रखडून ठेवत नाहीत त्यासाठी तुम्ही सर्व ग्रंथालय संस्था यांनी घटनेची माहिती व घटना बदल करताना संपूर्णपणे तुम्ही तुमचे इतिवृत्त उत्तम असायला हवे कसे लिहायला हवे याचा अभ्यास करा सभासद घोषवारा घटना बदल संस्था शपथ पत्र त्याचबरोबर घटना बदल बाबत तीन सभा त्यात कार्यकारणी सभा विशेष सभा आणि वार्षिक सर्वसाधारण सभा यामध्ये ते मंजूर करणे आवश्यक आहे सूचना इतिवृत्त प्रपत्र आधी सर्वांची योग्य पद्धतीत आणि तुम्ही सर्व वेळेत पूर्ण केले असेल तर निश्चितपणे तुमचे कुठलेही प्रस्ताव रखडले जाणार नाहीत सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय निश्चितपणे तुम्हाला अपेक्षित असलेले काम करेल पण त्यासाठी तुम्ही संस्थेचा कारभार पारदर्शकपणे करा असे स्पष्ट केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रंथालय चांगल्या पद्धतीत काम करत आहेत सध्या तपासणी मध्ये बदल करण्यात आला आहे त्यामध्ये सर्व संस्था ग्रंथालयाने आपल्या कार्यालयात शासनमान्य असा बोर्ड लावायला हवा तुमचे ग्रंथालयातील रेकॉर्ड लिहिताना पूर्ण काळजीपूर्वक ती लिहायला हवीत तुमचे संस्थेचे ग्रंथालयाचे रेकॉर्ड उत्तम असायला हवे वर्गणीदार सभासद याबाबत योग्य माहिती तुम्ही लिहून ठेवायला हवी जर तुम्ही शासनमान्य ग्रंथालयाचे काम करत असाल तर तुमचे सर्व रेकॉर्ड दर्जेदार आणि व्यवस्थित लिहायला हवे सर्व शासनमान्य ग्रंथालयात कमीत कमी सहा वर्तमानपत्रे त्या त्या वर्गवारीनुसार ठेवायला हवीत तुमचे ग्रंथालयाचे काम दर्जेदार आणि उत्तम करा असे त्यांनी सूचित केले यावेळी हिशोब तपासणीस राजू आडेलकर यांनी आपले विचार मांडले यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालय यांची अवस्था काय आहे त्यांच्या समस्या काय आहेत याची पूर्ण जाणीव आहे आपल्या न्याय हक्कासाठी आपणच लढायला हवे आपल्याला भाकरी हवी तर ते भाकरी मिळवण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवे ते आपण सर्वांनी एकत्र मिळून करूया असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी स्वागत अध्यक्ष देसाई वाचनालयाचे अध्यक्ष किशोर जैतापकर यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालयाचे सचिव राजन पांचाळ तर सूत्रसंचालन देसाई वाचनालयाचे सचिव रोहिदास राणे यांनी केले यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक नंदन वेंगुर्लेकर यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती मधुमती निकम यांना ग्रंथालय कारभाराबाबत सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आलेल्या विविध प्रस्तावना बाबत प्रश्न विचारण्यात आले त्याला उत्तमपणे त्यांनी उत्तर देत निश्चितपणे तुमचे सर्व प्रस्ताव योग्य पद्धतीत सादर करा ते मंजूर करण्यात येतील अशी ग्वाही दिली यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री हजारे यांनी उपस्थित ग्रंथालयांचे कर्मचारी यांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तरे दिली यावेळी मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयांचे संस्था पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते