लीना धुरी, महिमा मोहिते, स्नेहल ढोके, चंद्रकला सातपुते, विजया कांदळगावकर, वैशाली प्रभूझाट्ये ठरल्या विजेत्या
मालवण, दि.१० मार्च
ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या तर्फे महिला दिनाच्या निमित्ताने मालवणात आज पार पडलेल्या महिला मॅरेथॉन – रन फॉर हेल्थ या स्पर्धेला लहान मुलींपासून ते ८० वर्षापर्यन्तच्या महिला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे ३०० स्पर्धकांनी सहभाग घेत हि स्पर्धा धावत व चालत पूर्ण केली. या स्पर्धेत विविध सहा गटात लीना धुरी, महिमा मोहिते, स्नेहल ढोके, चंद्रकला सातपुते, विजया कांदळगावकर, वैशाली प्रभूझाट्ये यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
मालवण देऊळवाडा सागरी महामार्ग ते कोळंब पुल सागरी महामार्ग अशा २ किमी अंतराच्या मार्गावर हि स्पर्धा पार पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांची पहिली मॅरेथॉन स्पर्धा असलेल्या या स्पर्धेचे यावर्षी दुसरे वर्ष असून “चला धावूया रक्तदान जनजागृती साठी, चला धावूया प्लास्टिक मुक्ती साठी, चल सखी धावूया स्वतःच्या आरोग्यासाठी” असा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला. ८० वर्षाच्या स्पर्धक संगीता हळदणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. पहिले ४ गट धावणे आणि पाचवा व सहावा गटातील महिलांसाठी मिनी वॉक स्पर्धा असे या स्पर्धेचे स्वरूप होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – वयोगट – १६ ते २५ धावणे – १. लीना नरेश धुरी, २. मेधा सातपुते, ३.रेश्मा पांढरे, ४. श्रुती चव्हाण, ५. दिक्षा झोरे. वयोगट १० ते १५ धावणे – १. महिमा विशाल मोहिते, २. पूर्वा दत्तात्रय बांदकर, ३. हर्षाली सत्यवान वेंगुर्लेकर, ४. कावेरी लक्ष्मण परब, ५. लिशा मनोज चव्हाण. वयोगट २६ ते ३५ धावणे – १. स्नेहल ढोके, २. सोनाली रमेश पेडणेकर, ३. श्रेया सागर मांजरेकर, ४. नवेली नागेश चव्हाण, ५. पद्मिनी मयेकर. वयोगट – ३६ ते ४५ धावणे – १. चंद्रकला सातपुते, २. शर्वरी पाटील, ३. रुपाली चव्हाण, ४. नीलम मयेकर, ५. वर्षा सांबारी. वयोगट – ४६ ते ५५ – चालणे – १. विजया कांदळगावकर, २. अनुष्का कदम, ३. सुनीता जाधव, ४. अस्मिता संजय रावराणे, ५. अनिता आपा आळवे. वयोगट – ५६ वर्षावरील महिला – चालणे – १. वैशाली विनायक प्रभूझाट्ये, २. रसिका रवी तळाशीलकर, ३. पेरपेत मॅक्सी फर्नांडिस, ४. संजीवनी कुडाळकर, ५. संजना भरत आंबेरकर.
स्पर्धेतील सर्व गटातील विजेत्यांना चषक, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी सौ. अनिता आपा आळवे, सौ. जयश्री श्रीनिवास हडकर, सौ. रजनी रमाकांत चव्हाण, कु. तेजस्विनी परब यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी झुंजार रणरागिणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर सचिन आचरेकर यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ महिला स्पर्धक म्हणून संगीता हळदणकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच स्पर्धेच्या प्रयोजकांचा व योगज्योती योगा ग्रुपचा सन्मान करण्यात आला. तसेच लकी ड्रॉ मधील विजेत्यांनाही पारितोषिके देण्यात आली.
सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले. यावेळी ग्लोबल रक्तदाते समूहाचे विजय पांचाळ, नेहा कोळंबकर, राजा शंकरदास, विकास पांचाळ, राधा केरकर, बंटी केरकर, अमेय देसाई, मंदार ओरसकर, शिल्पा खोत, स्नेहा जामसंडेकर, सुविधा तीनईकर, वैशाली शंकरदास, रेनोल्ड बुतेलो, संदीप पेडणेकर, राजू बिडये, रूपा बिडये, गौरी सावंत, पल्लवी खानोलकर, समृद्धी धुरी, अंकुश कातवणकर, कविता वेंगुर्लेकर, पूजा तळाशीलकर, सहदेव साळगावकर, गणेश कोळंबकर, अनुष्का चव्हाण, ललित चव्हाण, मयु पारकर यांसह इतर उपस्थित होते.