भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पडेल मंडल अध्यक्षपदी अंकुश ठुकरुल यांची यांची नियुक्ती

देवगड
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पडेल मंडल अध्यक्षपदी अंकुश ठुकरुल यांची यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे पत्र सिंधुदुर्ग ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद नारायण मेस्त्री यांनी दिले आहे.
श्री ठुकरुल १९९४ पासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असून त्यानंतर आमदार नितेश राणे यांचेही प्रामाणिक विश्वासू कार्यकर्ते म्हणून कार्य करीत असताना पडेल जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष दोन वेळा ,तसेच पडेल जिल्हा परिषद प्रचार प्रमुख म्हणून काम करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्रप्रमुख सुपर वॉरियर, पडेल माजी सरपंच म्हणून सेवा बजावली असून सततचा जनसंपर्क असणारे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.पडेल भाजप सरचिटणीस रामकृष्ण जुवाटकर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.