बांदिवडेचे मिलिंद प्रभू “कृषीभूषण” पुरस्काराने सन्मानित!

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यक्रमाचे आयोजन

मसुरे,दि.१४ जानेवारी(झुंजार पेडणेकर)

भारतीय कृषक समाज नवी दिल्ली संलग्न भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती उत्सवा निमित्त कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणारा कृषीभूषण पुरस्कार मालवण तालुक्यातील बांदीवडे येथील मिलिंद प्रभू यांना समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला.
राहुरी अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे डॉ. पंजाबराव देशमुख जयंती सोहळा व भारतीय कृषक समाज राष्ट्रीय अधिवेशन समारंभात सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कोकण विभागात मसालापीक काळीमिरीची यशस्वी लागवड केल्याबद्दल सदर पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी भारतीय कृषक समाज नवी दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कृष्णविर चौधरी, इपको अध्यक्ष दिलीप संघानी, खासदार विजयसिंह तोमर, राहुरी विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर प्रशांत पाटील, ज्योती सुरसे, सुभाष नलांगे, लिंगराज पाटील, सुनील चौधरी, राजेश डोंगरा, ऍड अजित देवतिया, संजय राय आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मिलिंद प्रभूंसह डॉ. अनुपमा पात्रीकर , सी. आर. पिंपळकर यांना कृषी भूषण पुरस्कार तर शिवाजी डोळे, अशोक खाडे, बी. टी. गोरे यांचा कृषिरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आभार रंगनाथ भापकर यांनी मानले. हा पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल मिलिंद प्रभू यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.