देवगड, दि.१० मार्च
देवगड जमसंडे नगरपंचायत हद्दीतील ४ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या २२ विकास कामांचा शुभारंभ आमदार नितेश राणे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी माजी आम.अजित गोगटे,बाळ खडपे,जिल्हा सरचिटणीस संदीप साटम,भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर,अध्यक्ष दयानंद पाटील,भाजप गटनेते सरचिटणीस शरद ठुकरुल,नगरसेविका,नगरसेविक अन्य भाजप पदाधिकारीबकार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना सन २०२४ महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरस्थान मधून या २२ विकास कामांचा समावेश असून या २२ विकास कामाकरता ४ कोटी ५०
लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे या विकास कामांमध्ये प्रामुख्याने देवगड जामसंडे तर वाडी गांगेश्वर मंदिर गांगोची व्हाळी प्रवीण कांबळी कलम बाग के देवराना पर्यंतचा रस्ता खडीकरण व नुतनीकरण करणे, जामसंडे खाक्षी मनोहर कोयघाडी घर ते नदीपर्यंत बंदिस्त गटार बांधणे, देवगड जामसंडे वडंबा डॉक्टर किरण मराठे हॉस्पिटल ते टिळक नगर संतोष मेस्त्री घरापर्यंतचा रस्ता ५ मीटर रुंद करून बीएम कार्पेट तयार करणे, नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक १४ मध्ये श्रीकृष्ण नगर येथील श्रीकृष्ण मंदिर रस्ता व अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण करणे, देवगड जामसांडे नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक १४ मधील श्रीकृष्ण मंदिर ते सुहास गोगटेपर्यंत रस्ता खडी करण डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक १५ आचरेकर कंपाउंड येथे श्री लाड यांचे घरापासून सुहास भोवर यांच्या घरापर्यंत नवीन रस्ता तयार करणे,जाम संडे मुख्य रस्ता ते धोपटेवाडी पर्यंत जाणारा उर्वरित रस्ता डांबरीकरण करणे व रस्त्यालगत बंदिस्त गटार बांधणे,जामसंडे बेलवाडी कांनखोल भटवाडी पवार घर ते पराडकर घरापर्यंत रस्ता खडीकरणं करून डांबरीकरण करणे, बेलवाडी शाळा ते ठुकरुल वाडी मार्ग रस्ता नुतनीकरण करून आधार भिंत बांधणे,आनंद साटम घर ते हॉटेल वेदा पर्यंत रस्ता खरीकरण डांबरीकरण करणे, साटम हॉटेल ते कबरस्थान पर्यंतचा रस्ता तयार करणे जामसंडे लवअंकुश भाजी दुकान ते तांबे घरापर्यंत आरसीसी बंदिस्त गटार बांधणे, कावलेवाडी बोअरवेल जवळ नवीन दहा हजार लिटर क्षमतेची पाणी साठवण टाकी बसविणे व नवीन चबुतरा बांधणे कावले मांडघर ते श्रीधर कावले यांच्या घरापर्यंत मंदिर गटाराची उंची वाढवून झाकणी बसवणे, पाटकरवाडी सचिन पाटकर घरापासून संतोष पाटकर घरापर्यंत संरक्षण भिंत बांधने, पाटकरवाडी विजय पाटकर घरापासून ते संतोष पाटकर यांच्या घरापर्यंत पायवाटेचे काँक्रीट करून मजबूती गरज करणे,मॉडर्न बेकरी ते लाड घरापर्यंत आरसीसी बंदिस्त गटात बांधणे, भटवाडी रस्ता आदर्श शाळा ते ओझर आरसीसी बंदिस्त गटार बांधणे, गोखले घर ते तेली घररस्त्यालगत संरक्षण भिंत बांधणे, कन्या शाळा ते मारुती मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण नूतनिकरण करणे भटवाडी स्मशानभूमी उर्वरित कंपाउंड वॉल बांधणे, व इतर सुविधा निर्माण करणे, देवगड किल्ला गणपती मंदिराशेजारी भक्त निवासाचे उर्वरित काम करणे या विकास कामांचा समावेश आहे.