डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरात श्री भवानी मातेचा वार्षिक गोंधळ 29 मार्च रोजी

मालवण, दि.१० मार्च

मालवण तालुक्यातील डांगमोडे येथील जागृत देवस्थान असणाऱ्या श्री देव रवळनाथ मंदिरात श्री भवानी मातेचा वार्षिक गोंधळ उत्सव शुक्रवार दिनांक २९ मार्च रोजी होणार आहे.

दारूबंदीचा पुरस्कर्ता असणारा आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवास सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच मुंबई, पूणे ,कोल्हापूर येथील भाविक उपस्थित राहतात. यावर्षी हा उत्सव २९ मार्च रोजी होणार आहे. यावेळी सकाळी श्री देव रवळनाथाची विधिवत पूजा अर्चा तर रात्रौ दहा वाजता श्री भवानी मातेचा गोंधळ उत्सवास सुरुवात होणार असून यावेळी श्री भवानी मातेचा मांड, देवदेवतांच्या तरंग मिरवणूक तसेच भवानी मातेची खणा नारळाने ओटी भरणे व इतर कार्यक्रम होणार आहेत. तरी या उत्सवास भाविकांनी उपस्थित राहून श्री च्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त श्री देव रवळनाथ मंदिर डांगमोडे यांनी केले आहे.