घाडीगावकर समाजाचा जागतिक महिला दिन सोहळा संपन्न

देवगड, दि.१० मार्च
क्षत्रिय मराठा घाडीगाववर सेवा समाज, महाराष्ट्र राज्य, मुंबई या समाजाच्या वतीने नुकताच मुंबई येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष घनश्याम गावकर, घाडीगावकर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रघुवीर वायंगणकर, समाजाच्या मध्य विभागाचे अध्यक्ष विकास घाडी, समाजाचे सरचिटणीस गजानन घाडीगावकर, तसेच समाजाच्या मध्य मुंबई विभागाचे विभागाच्या महिला प्रमुख दर्शना घाडीगावकर व रश्मी घाडीगावकर, तसेच सुवासिनी गावकर या व्यासपीठावर उपस्थित होत्या. सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तसेच महिला दिनानिमित्त विविध महिलांचे सत्कार करण्यात आले. तसेच महिलांच्या विविध सक्षमी करण्याच्या योजना बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रघुवीर वायंगणकर यांनी समाजाच्या महिलांबाबत आदराचे भाषण केले. सदर महिला दिन हा काही वर्षांपूर्वी सुरू झाला. त्यामुळे पूर्वीच्या ज्या महिला होत्या. त्यांना सतत ३६४ दिवस राबावे लागत होते. त्यांच्या सक्षमीकरणाबाबत कधीच समाज जागृत झाला नाही, असे यावेळी रघुवीर वायंगणकर यांनी सांगितले. तर आज संपूर्ण क्षेत्रामध्ये महिला प्राधान्याने दिसत आहेत. त्यामध्ये भारतीय सैनिक असो, विमानाचे पायलट असो, किंवा लोको पायलट असो सर्वच क्षेत्रांमध्ये आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. त्याचबरोबर राजकारणामध्ये सुद्धा महिलांसाठी 50 टक्के आरक्षण सुद्धा करण्यात आलेले आहे. तर घनश्याम गावकर यांनी समाजातील महिलांना भविष्यात कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास आम्हा समाज बांधवांना हाक मारावी. आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहो. तसेच आज महिलांनी जी प्रगती केली आहे यापुढे त्याहीपेक्षा प्रगती होवो अशा महिलांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात रश्मी घाडी यांनी प्रास्ताविक केले. या मेळाव्यात ज्योती प्रकाश घाडी व अन्य महिलांनी आपले विचार मांडले. तर विकास घाडी यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर सूत्र संचालनाचे काम गौरी गावकर हिने केले. सदर मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दर्शना घाडीगावकर व रश्मी घाडीगावकर यांनी विशेष प्रयत्न केले.