राष्ट्रीय जुडो पटू संपदा संजय फाळके हिचा देखील महिला खेळाडू म्हणुन सत्कार

मुंबई, दि.१० मार्च
भारतीय जनता पक्ष, भायखळा विधानसभा वॉर्ड २०८,आयोजक संध्याताई भगत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एकल महिलांचा गुणगौरव समारंभ काल लुनावा भवन, राणीबाग,भायखळा येथे आयोजित केला होता त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा मुंबई उपाध्यक्ष शलाकाताई साळवी, जिल्हाध्यक्ष शरदजी चिंतनकर,महिला अध्यक्ष रचना ताई शिरसाट, विधानसभा अध्यक्ष नितीनजी बनकर,विधानसभा महिला अध्यक्ष रागिणीताई मांजरेकर, मा.नगरसेविका सुरेखाताई लोखंडे ,भायखळा निवडणूक प्रमुख रोहिदासजी लोखंडे,जिल्हा महामंत्री सौ तावडे, वॉर्ड अध्यक्ष सौ सुनीता शेळके,सिंधु मांजरेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी राष्ट्रीय जुडो पटू संपदा संजय फाळके हिचा देखील महिला खेळाडू म्हणुन सत्कार करण्यात आला.