नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ७ मधील विकास कामांचा शुभारंभ प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते

देवगड-
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ७ मधील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत विकास कामांचा शुभारंभ प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते करण्यात आला .प्रभाग क्रमांक ७ मधील देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या प्रभागातील दोन कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ श्रीफळ फोडून ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील दोन कोटी रुपयांच्या प्रभाग क्रमांक ७ मधील मंजूर कामांचा शुभारंभ मंगळवारी सकाळी शहाबुद्दीन खान ,भास्कर कोयंडे ,दत्ताराम तारकर, नारायण धुरी ,राकेश फाटक ,तुकाराम मुणगेकर यांच्या या जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत लोकप्रतिनिधी अथवा प्रमुख पदाधिकारी यांच्या शुभहस्ते विकास कामांचा शुभारंभ न होता प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना हा मान दिल्याबद्दल उपस्थित नागरिकांमधून समाधान व्यक्त होत होते . यावेळी नगराध्यक्ष साक्षी प्रभू ,नगरसेवक रोहन खेडेकर, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल लोके, महिला आघाडी उप तालुकाप्रमुख स्वप्नाली वाल्मिकी यांच्या समवेत प्रभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने माधव कुळकर्णी, प्रफुल्ल कणेरकर, प्रदोष कोयंडे, शराफत खान, निलेश कणेरकर, सुहास कणेरकर ,विश्वनाथ मेस्त्री ,प्रदीप राऊत, यशवंत देऊलकर, सुरेश मिस्त्री सचिन मुणगेकर,कुणाल मणचेकर, बाळा कणेरकर, ,आनंद लोके राजेंद्र हिंदळेकर, पांडुरंग कुळ्ये ,दत्ताराम तारकर प्रकाश मोंडकर , मोहन कोयंडे उपस्थित होते.
या विकास कामांमध्ये देवगड “जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग ७ मधील जामसंडे मळई उताराचा रस्ता ते मळई मशिदी पर्यंत रस्ता नूतनीकरण करणे, तुळशी काटे पश्चिम कॉलेज रस्त्यापासून मणचेकर यांच्या घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण करणे, तुळशी काटे कॉलेज रस्ता ते धनाजी मोहिते यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, जामसंडे कावलेवाडी मुख्य रस्ता ते सहकार नगर गोपने यांच्या घरापर्यंत रस्ता नूतनीकरण करणे, कावलेवाडी मुख्य रस्ता ते विजय तारकर घर ते सहकार नगर शिंगे सर यांच्या घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, सहकार नगर श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय ते मोहन कोयंडे यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, या देवगड जामसंडे नगरपंचायत प्रभाग क्रमांक ७ मधील विकास कामांचा समावेश आहे.